ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लॉकडाऊन दरम्यान 10 बँकांचं विलिनीकरण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 29, 2020 08:01 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लॉकडाऊन दरम्यान 10 बँकांचं विलिनीकरण

शहर : देश

कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊन या दरम्यान देशाची बँकिंग व्यवस्था सुधारण्यासाठी सरकार 1 एप्रिलपासून बँकांचं विलिनीकरण करणार आहे. सरकारच्या या निर्णयाने बँकिंग व्यवस्थेला अधिक मजबूती मिळणार आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच 10 बँकांचं विलिनीकरण करत 4 नवीन बँकां बनवण्यात येणार आहेत.

यूनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत करण्यात आलं आहे. या बँकांच्या विलिनीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक बनली आहे. तर सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेसोबत विलिनीकरण झालं आहे. त्याशिवाय अलाहबाद बँकेचं इंडियन बँकेत विलिनीकरण झालं आहे. तर आंध्रा बँक आणि कॉरपोरेशन बँकचं यूनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालं आहे.

या विलिनीकरणानंतर देशात सात मोठ्या बँका असणार आहेत, ज्यांचा व्यवहार 8 लाख कोटी रुपयांहून अधिक असेल. विलिनीकरणानंतर देशात सात मोठ्या बँका आणि पाच छोट्या बँका असतील. 2017 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 27 इतकी होती. त्याशिवाय सरकारने बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांचं विलिनीकरण केलं. या तीन बँकांच्या विलिनीकरणानंतर बनणारी बँक देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असेल.

एप्रिल 2017 मध्ये भारतीय स्टेट बँकमध्ये 5 सहाय्यक बँका- स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅन्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँका विलिन करण्यात आल्या. देशात आलेल्या कोरोनामुळे हे विलिनीकरण काही वेळासाठी स्थगित करण्याची अफवा होती. मात्र कोरोना किंवा लॉकडाऊनमुळे या विलिनीकरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

 

मागे

वृत्तपत्रातून कोरोना पसरत नाही; ‘डब्ल्यूएचओ'चा निष्कर्ष
वृत्तपत्रातून कोरोना पसरत नाही; ‘डब्ल्यूएचओ'चा निष्कर्ष

जगभरातील ज्येष्ठ डॉक्टर आणि वैज्ञानिकांच्या म्हणणनुसार, वृत्तपत्र, नियतक....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना असल्यास केवळ पाच मिनिटांत कळणार
कोरोना असल्यास केवळ पाच मिनिटांत कळणार

देशात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सॅम्पल्स टेस्ट कीट कम....

Read more