ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यात एका दिवसात 11 कोरोनाबाधित रुग्ण वाढले, आरोग्यमंत्र्यांची माहीती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 11:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यात एका दिवसात 11 कोरोनाबाधित रुग्ण वाढले, आरोग्यमंत्र्यांची माहीती

शहर : मुंबई

राज्यात एका दिवसात 11 कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून आजचा आकडा 63 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कालपर्यंत राज्यात 52 कोरोनाबाधित रुग्ण होते. यामध्ये आता 11 रुग्ण वाढले असून त्यातील 10 मुंबईचे तर 1 पुण्याचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

६३ पैकी १४ लोक हे संसर्गानेतर तर इतर हे बाहेरून आलेले आहेत ही महत्वपूर्ण आणि काहीशी दिलासादायक बातमी देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

काल पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या व्हिडीओ कॉन्फरंसिंगनुसार टेस्टिंग लॅब वाढवण्यात येणार आहेत. सर्व मेडिकल हॉस्पिटलमध्ये टेस्टिंग फॅसिलिटी तयार करणार आहोत. यापूर्वी 3 लॅब्स होत्या.  आता 7 लॅब्स असल्याचेही ते म्हणाले.

गावी जाण्यासाठी लोक रेल्वे स्टेशनवर गर्दी करतायत, त्यांना जावू देण्यासाठी जादा रेल्वे सोडण्याची गरज राजेश टोपे यांनी व्यक्त केली. लोकल बंद करायला हव्यात असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे मत आहे. गर्दी कमी होत नसेल तर लोकल बंद कराव्या लागतील असेही ते म्हणाले.

एसीचा वापर कमी करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. कारण थंडीत कोरोनाला पोषक वातावरण मिळू शकते. कडक ऊन्हाच्या हवामानात त्याचे आयुर्मआन कमी असते असेही ते म्हणाले.

मागे

कामगारांप्रती संवेदना बाळगा अन्यथा...., कामगार आयुक्तांचे आदेश
कामगारांप्रती संवेदना बाळगा अन्यथा...., कामगार आयुक्तांचे आदेश

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. देशालाही याची झळ बसली असून पंतप्रधान मोदी....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालयं कमी पडू नये, केईएम आणि नायर रुग्णालयं रिकामी करण्याचे आयुक्तांचे आद
कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालयं कमी पडू नये, केईएम आणि नायर रुग्णालयं रिकामी करण्याचे आयुक्तांचे आद

जगभरात कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला आहे. देशासह मुंबई आणि महाराष्ट्रातह....

Read more