ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुढल्या महिन्यात 11 दिवस बँक बंद

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 05:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुढल्या महिन्यात 11 दिवस बँक बंद

शहर : मुंबई

दिवाळी आणि दसऱ्या या सणांमुळे पुढील महिन्यात 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये बँकेची कामासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. 11 दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती, राम नवमी, दसरा, दिवाळी, गोवर्धन पुजा आणि भाऊबीज यांसारखे सण आले आहेत.

ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग तीन दिवस आणि चौथ्या आठवड्यात सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. 6 ऑक्टोबरला रविवार, 7 ऑक्टोबरला महानवमी आणि 8 ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त बँका बंद राहणार आहेत. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. महिन्यातील चौथा शनिवार असल्याने 26 ऑक्टोबरला बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. दिवाळीला रविवारी (27 ऑक्टोबर) सुरुवात होणार असून, 28 ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे. 29 ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँका बंद राहणार आहेत.

मागे

रिझव्‍‌र्ह बँकेविरोधात रिट याचिका दाखल करणार
रिझव्‍‌र्ह बँकेविरोधात रिट याचिका दाखल करणार

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) खातेदार-ठेवीदा....

अधिक वाचा

पुढे  

मूल्याधारीत रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज -  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मूल्याधारीत रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज -  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर ....

Read more