By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2019 06:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : virar
विरार पश्चिम येथील ए बी इस्टेट परिसरात तनीष महाडिक या 11 वर्षाच्या मुलगाने असे धाडस केले की त्याच्या धाडसाचे सगळेच वाहवाह करत आहेत. ए बी इस्टेट मध्ये राहणारे दिव्या महाडीक मुलीला शाळेत सोडायला गेल्या होत्या. तेव्हा त्यांचा 11 वर्षाचा मुलगा तनिष एकटाच घरात होता.
त्या वेळी एक सराईत चोर घरात घुसला. तनिषला धमकावून तो घरातील दागिने घेऊन जात होता. त्याच्या हातात आईचे दागिने पाहून तनिषने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. चोर अंगाने मजबूत होता. तरी देखील तनिषने त्याच्या हातातील सोन्याचा हार हिसकावुन आरडाओरड केली. तितक्यात तनिषची आई दिव्या तिथे आल्या त्यांनीही चोराला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो निसटला. मात्र त्यांनी आरडाओरड केल्याने सोसायटीतील नागरिकांनी पळणार्या चोराला पाठलाग करून पकडले. त्याचे हात बांधले. त्याला चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. हा चोर सराईत असून त्याने 7-8 घरफोड्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
नारपोलीतील चंदनपार्क मध्ये असलेल्या कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली आह....
अधिक वाचा