By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 28, 2020 12:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : भारतीय संरक्षण दलात सेवा करण्याची महत्वाकांक्षा असणार्या १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय संरक्षण अकादमीत (एनडीए) प्रवेशाची संधी आहे. विद्यार्थी १२ वी उत्तीर्ण असावा आणि त्याचे वय साडेअठरा वर्ष असावे. एनडीए ही तिन्ही सेना दलांमधील अधिकारी प्रशिक्षणांची जागतिक एकमेव संयुक्त संस्था आहे. ही संस्था पुण्याजवळ खडकवासला येथे आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी असलेली ही परीक्षा यूपीएससीमार्फत ९ एप्रिलला घेण्यात येणार आहे. त्यासाठी २८ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. १२ वी नंतर थेट नौदलात जाण्यासाठी केरळमधील एझिमला येथील नौदल अकादमीत प्रशिक्षण दिले जाते. एनडीएसोबतच या अकादमीची परीक्षादेखील होणार आहे. उमेदवारांना त्यांचे अर्ज भरता येतील.
ही परीक्षा सामान्य क्षमता व गणित मिळून ९०० गुणांची असेल. त्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत, वैद्यकीय चाचणी व अन्य चाचण्यानंतर अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे जानेवारी २०२१ पासून प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षण सुरू होते वेळी उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या १२ वी ची परीक्षा देणारी मुले यासाठी अर्ज करू शकतात. एनडीएत एकूण ३७० जागा आहेत. त्यापैकी आर्मीत २०८, नौदलात ४२ व हवाई दलात १२० आणि नौदल अकादमीत ४८ जागा आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनासाठी प्रामुख्याने मुंबई, नागरपूर व पणजी येथे परीक्षा केंद्र असेल.
आर्मीसाठी कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण (प्रशिक्षण सुरू होते वेळी) विद्यार्थी असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थांना भविष्यात आर्मीतील तांत्रिक दलात जायचे आहे त्यांच्यासाठी विज्ञान विषय आवश्यक आहे. हवाई दल, नौदल व नौदल अकादमीसाठी भौतिकशास्त्र व गणितासह १२ उत्तीर्ण (प्रशिक्षण सुरू होते वेळी) आवश्यक आहे. २ जुले २००१ ते १ जुले २००४ दरम्यान जन्मलेली मुले असावीत. शारीरिक क्षमता-किमान उंची १५६ सें.मी. ( हवाईदलासाठी १६२.५सें.मी.) दृष्टी चषम्याशिवाय ६/६,६/९, चषम्यासह ६/६,६/६ आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी शारीरिक तंदरुस्तीकरिता सराव ठेवावा. लेखी परीक्षा (बहू पर्यायी नकारात्मक गुणांसह) गणितासाठी ३०० गुण असून वेळ अडीच तास इतका असेल तर सामान्य क्षमतेसाठी ६०० गुण असून वेळ अडीच तासच असेल. सामान्य क्षमता चाचणीत इंग्रजी २०० भौतिकशास्त्र १००, रसायनशास्त्र ६०, सामान्य विज्ञान ४०, इतिहास-समाजशास्त्र ८०, भूगोल ८० व सामान्य ज्ञान ४० गुणांचा समावेश असेल.
एनडीएसाठी तिन्ही दलातील कॅडेट्स बी.टेक, बी.एस.सी (कम्प्युटर) या विषयात पदवी घेऊ शकतील. या सर्व पदव्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून दिल्या जातात. नौदल अकादमीतील कॅडेट्सचे प्रशिक्षण चार वर्षांचे असेल. ते बी.टेकची पदवी घेतील.
यासाठी www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर २८ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६ पर्यंत अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज ४ ते ११ फेब्रुवारी २०२० पर्यंत मागे घेता येतील. परीक्षा शुल्क १०० रुपये आहे.
पुणे : पुण्यातील संभाजी नगरामध्ये खराडी येथील एका घरात झालेल्य....
अधिक वाचा