By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 13, 2020 12:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशात १३ नवे कोरोना व्हायरस बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत या विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ७३ वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि सरकारतर्फे योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. आज मुंबईत हिंदुजा रुग्णालयात एका रुग्णाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत पदेशातून ९४८ प्रवाश्यांना मायदेशात आणले आहे. यात ९०० भारतीय आणि ४८ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, इराणमध्ये अडकलेल्या १२० भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान आज जैसलमेर इथे उतरणार आहे.
इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्काराने देशातल्या सात शहरांमध्ये किमान ४०० लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली.
दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी काही भारतीय मायदेशात परतणार आहेत. त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विलगीकरणासाठीची ही व्यवस्था जोधपूर, झांसी, गोरखपूर, कोलकाता, जैसलमेर, चेन्नई आणि देवळाली इथे करण्यात येणार आहे. या ठिकाणी लोकांना विलगीकरणासाठी ठेवता येईल असेही ते म्हणाले.
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या तडाख्यात जगातील अनेक नामां....
अधिक वाचा