ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धारावीत आणखी १५ जणांना कोरोनाची लागण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 12, 2020 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धारावीत आणखी १५ जणांना कोरोनाची लागण

शहर : मुंबई

शहरातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावी परिसरात रविवारी कोरोनाचे १५ नवे रुग्ण सापडले. यापैकी सहाजण हे हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. या सर्वांना राजीव गांधी स्पोर्टस कॉम्पेक्समध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. तर उर्वरित नऊ रुग्ण धारावीच्या शास्त्रीनगर परिसरातील आहेत. त्यामुळे आता धारावीतील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४३ इतका झाला आहे. याशिवाय, दादर परिसरातही कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. कालच येथील चितळे पथ परिसरातील एक कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. दादरमधील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १३ वर गेली आहे.

मात्र, तरीही धारावीतील नागरिकांना अजूनही कोरोनाचे फारसे गांभीर्य नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. येथील नागरिक भाजी खरेदीसाठी अजूनही गर्दी करताना दिसत आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना अक्षरश: हरताळ फासला जात आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर धारावीतील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. पोलिसांनी बॅरिकेटस् लावून येथील रस्त्यांची नाकेबंदी केली आहे.

धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट मानला जात आहे. त्यामुळे आता याठिकाणी लवकरच कोरोनाच्या रॅपिड टेस्टला सुरुवात होणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दक्षिण कोरियाकडून जवळपास एक लाख टेस्ट किटस् मागवली आहेत. याशिवाय, केंद्र सरकारकडूनही काही किटस् मिळणार आहेत. राज्यभरात आतापर्यंत १,८३८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १,१४६ रुग्ण एकट्या मुंबईत आहेत.

मागे

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,574 वर, मृतांचा आकडा 110; घरगुती विलगीकरणात 38937 व्यक्ती
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,574 वर, मृतांचा आकडा 110; घरगुती विलगीकरणात 38937 व्यक्ती

गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याने द्विशतक ....

अधिक वाचा

पुढे  

देशात २४ तासांत कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू
देशात २४ तासांत कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू

देशभरात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या ९०९ ने वाढली आहे. तर ३४ लोक....

Read more