By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 05, 2019 12:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
ओडीशातील चक्रीवादळ फोनीच्या विळख्यात येऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या शनिवारी वाढून 16 वर पोहोचली आहे. राज्यातील साधारण 10 हजार आणि 52 शहरी क्षेत्रात पुनरवसनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साधारण 1 कोटी जणांना या वादळाचा फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या भागाची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. हे चक्रीवादळ अतिशय शक्तीशाली मानले जाते. ग्रीष्मात येणारे दुर्लभातील दुर्लभ असे चक्रीवादळ असून गेल्या 43 वर्षात पहिल्यांदाच ओडीशात पोहोचले आहे. तर गेल्या 150 वर्षांत आलेल्या तीन ताकदवान वादळांपैकी एक आहे.
वादळामुळे शहरातील इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील अनेक भागात अजूनही पाणी आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीची तटरक्षक दलाकडून हवाई पाहणी करण्यात आली. फॅनी चक्रीवादळ आता बांग्लादेशात पोहोचले आहे. पण त्याआधी शुक्रवारी या वादळाने जो काही उत्पात ओडिशा घडवला, त्याची दृष्यं काळजाचा थरकाप उडवणारी आहेत. पण नैसर्गिक आपत्तीचा सामना कसा करावा याचं उत्तम उदाहरण ओडिशानं घालून दिले आहे.ओडिशाने देशातलं सर्वात गरीब राज्य, पण गेल्या ७२ तासात ओरिशाने जे साधले ते भल्या भल्यांना डोळ्यात अंजन घालणारे आहे. फॅनी ओरिशाच्या किनाऱ्यावर धडकले त्यावेळी त्याचा वेग ताशी २०० किमी होता. पण वादळ येणार हे कळल्यावर ओरिशा सरकारनं ज्या वेगात पावलं उचलली त्यावेगानं फॅनीचा नांगीच ठेचून टाकली. निसर्गाच्या रौद्र रुपाला नवीन पटनायक आणि त्यांचं प्रशासन ज्या प्रकारे सामोरं गेले, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. १ मे रोजी ओरिशात अतितीव्र फॅनी वादळ धडकणार असल्याची इशारा सर्वदूर देण्यात आला. ओरिशामधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणात तातडीनं कामाला लागली १७ जिल्ह्यात वादळाचा प्रभाव पडणार होता.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाकडूनसर्जिकल स्ट्राइकवरुन दावे प्रतिद....
अधिक वाचा