ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सीआरपीएफवर नक्षलवादी हल्ला, 17 जवान शहीद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 07:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सीआरपीएफवर नक्षलवादी हल्ला, 17 जवान शहीद

शहर : देश

सीआरपीएफ-डीआरजी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 17 जवानांना वीरमरण आलं आहे.शनिवारी रात्री (21 मार्च) सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलीस स्टेशन अंर्तगत असणाऱ्या बुर्कापाल जंगलात सीआरपीएफने कोंबिंग ऑपरेशन सुरु केलं (Naxal attack on CRPF and DRG). यावेळी नक्षलवाद्यांनी कोंबिंग ऑपरेशन करणाऱ्या 150 जवानांवर अचानक हल्ला केला. यानंतर पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. नक्षलवाद्यांशी लढताना 14 जवानही जखमी झाले.

दरम्यान, सीआरपीएफ आणि आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर सुरुवातीला 13 जवान बेपत्ता होते. मात्र, शोध मोहिमेत त्यांचे मृतदेह सापडले. पोलिस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमकीच्या वेळी पोलिस दलाला नक्षलवाद्यांनी वेढल्यानंतर जिल्हा मुख्यालयाकडून मदत मागण्यात आली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांचं हेलिकॉप्टर घटनास्थळावर दाखल झालं. हेलिकॉप्टर बघताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस जवानांवर रायपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन वर्षांपूर्वीदेखील सुकमा जिल्ह्यातील बुर्कापाल जंगल परिसरातच 200 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ पथकावर हल्ला केला होता. सीआरपीएफची एक तुकडी गस्त घालत असताना बुर्कापाल जंगलात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.

मागे

जनता कर्फ्यूच्या वेळेत वाढ, रस्त्यावर दिसल्यास कारवाई होणार
जनता कर्फ्यूच्या वेळेत वाढ, रस्त्यावर दिसल्यास कारवाई होणार

पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी 19 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्य....

अधिक वाचा

पुढे  

जनता कर्फ्यू : पंतप्रधान मोदींनी मानले जनतेचे आभार
जनता कर्फ्यू : पंतप्रधान मोदींनी मानले जनतेचे आभार

देशात सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या धोक....

Read more