ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यात भिंत कोसळून १७ मजुरांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 29, 2019 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात भिंत कोसळून १७ मजुरांचा मृत्यू

शहर : पुणे

पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १७ मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश आहे. कोंढव्यात तालाब कंपनीसमोर सिमाभिंत लेबर कँम्पवर ही संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत १६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आले आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.बचावकार्य सुरू असून चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार, असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झी २४ तासला दिली.

१६ मजुरांवर झोपेतच काळाने घाला घातल्याची घटना घडली. कोंढवा बुद्रुक परिसरात आल्कन स्टायलिश इमारतीची संरक्षक भिंत मजुरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही भिंत मोठी असल्यानं आणि कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा ढिगारा घटनास्थळी पडला.

मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहेजखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्येही मुलांचा समावेश आहे. या भिंतीला लागून मजुरांच्या कच्च्या झोपड्या होत्या. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

कोंढव्यात तालाब कंपनीसमोर सिमाभिंत लेबर कँम्पवर संरक्षक भिंत कोसळली. बिहारचे मजुर होते अशी माहिती मिळत आहे. ठार झालेले बाधंकाम मजुर होते. शेजारी सुरु असलेल्या इमारतीवर बाधंकाम मजूर म्हणून काम करत होते.

 

मागे

झाड कोसळून रिक्षा चालकाचा मृत्यू
झाड कोसळून रिक्षा चालकाचा मृत्यू

झाड पडून रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. विष्णू सोळंकी असं २२ वर्षीय रिक्षाचालक....

अधिक वाचा

पुढे  

एका रेशनकार्डवर देशभरात कुठेही घ्या शिधा
एका रेशनकार्डवर देशभरात कुठेही घ्या शिधा

केंद्र सरकार देशभरात एका रेशनकार्डवर (शिधापत्रिका) शिधा देण्याची योजना आखत....

Read more