By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 02, 2019 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. या पावसामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुढील काही तासांत पाऊस पडण्याची शक्यता असून पावसाच्या इशाऱ्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तामिळनाडूत मुसळधार पावसाने दैना उडवून दिली आहे. मेट्टूपलायमजवळच्या नादूर गावात चार घरे कोसळली असून या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. नादूर हे गाव कोइमबतोरपासून ५० किमी अंतरावर आहे. सर्व जण गाढ झोपेमध्ये असताना पहाटेच्या ५.३० च्या सुमारास ही घटना घडली.
घराजवळ एक २० फूट उंचीची भिंत होती. हीच भिंत घरांवर कोसळल्याने घरे जमीनदोस्त झालीत. घराच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण नअडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने मदत केली. या बचाव पथकाने सर्व मृतदेह बाहेर काढून मेट्टूपलायममधील सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत.
भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी फडणवीसांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात....
अधिक वाचा