By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2020 04:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना रुग्ण वाढणं ही चिंतेची बाब असली तरी एक काहीशी दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात अद्याप कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झालं नसल्याचं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीत सांगितलं आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्या पार्श्वभूमीवर देशातील जिल्ह्यात हॉटस्पॉट जिल्हे, नॉन-हॉटस्पॉट जिल्हे असं विभाजन करण्यात येणार आहे. तसंच कोरोना संसर्गाबाबत घरा-घरांत सर्व्हे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने राज्यांशी याबाबत चर्चा केली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या हॉटस्पॉट्सशी सामोरं जाण्यासाठी राज्यांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. देशात 170 जिल्हे कोरोना हॉटस्पॉट जिल्हे घोषित करण्यात येणार आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी सतत देखरेख ठेवली जाणार आहे. गंभीर कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर बनवण्याबाबत राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असं अग्रवाल यांनी सांगितलं आहे.
देशात आतापर्यंत 11933 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 1344 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे 392 लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत भारतात लॉकडाऊन....
अधिक वाचा