By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 26, 2019 03:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
राजस्थानच्या सिरोही शहरातील माली विद्यार्थी निवासस्थान क्षेत्रातील एका नाल्यावर बनलेला फुटपाथ कोसळल्यानं अपघात घडलाय. एका व्यावसायिक कॉम्प्लॅक्सच्या बाहेर असलेल्या नाल्यावर हा फुटपाथ बनलेला होता. या अपघातात फुटपाथवर उभे असलेले दोन लोक नाल्यात पडलेले व्हिडिओत दिसत आहेत. काही दुकानदारांनी आपलं सामान फुटपाथवर ठेवलं होतं तेही नाल्यात पडून खराब झालं. त्यामुळे दुकानदारांचंही नुकसान झालंय.
#WATCH: Portion of a footpath built over a drain, collapsed yesterday in Sirohi; 2 injured. #Rajasthan pic.twitter.com/4Ja6pgEt94
— ANI (@ANI) October 26, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात घडला तेव्हा मोठा आवाज झाला. त्यामुळे उपस्थित नागरिकांचाही एकच गोंधळ उडाला. त्यांनी तातडीनं नाल्यात पडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी धाव घेत त्यांना बाहेर काढलं. या दोघांचाही जीव वाचलाय हे सुदैव... दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीच्या निमित्तानं त्यांनी आणलेलं सामानं फुटपाथवर ठेवलं होतं. या अपघातात जवळपास २ ते ३ लाखांच्या सामानाचं नुकसान झालंय.
भारताची शिखर बँक असलेल्या 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'नं आपल्या साठ्यातील सो....
अधिक वाचा