ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

२० कोटी भारतीय मनोरुग्ण

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 12:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

२० कोटी भारतीय मनोरुग्ण

शहर : देश

           नवी दिल्ली - देशात दर ७ व्यक्तींमध्ये १ व्यक्ती गंभीर मानसिक आजाराने ग्रासला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती 'लॅन्सेट सायकॅट्री' नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. जर्नलमध्ये देण्यात आलेली आकडेवारी २०१७ पासूनची आहे. जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. नैराश्य (डिप्रेशन) आणि एंग्झायटी हे सर्वसाधारण आढळून आलेले आजार आहेत. 


           या आजारांनी पीडित असलेल्यांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. हा अभ्यास ‘इंडिया स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटीव्ह’ने केला आहे. भारतात सन १९९० पासून ते सन २०१७ पर्यंत म्हणजेच २७ वर्षांच्यां काळातील आकडेवारीवर आधारित आहे. भारतात १९.७ टक्के म्हणजेच २० कोटी लोक मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. मानसिक आजार असलेले लोक देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १४.३ टक्के इतके आहेत. यांपैकी ४.६ कोटी लोकांना नैराश्याने (डिप्रेशन) ग्रासले आहे. तर ४.५ कोटी लोक एग्झायटीने त्रस्त होते.


            नैराश्य आणि चिंता विकार या मानसिक आजारांचे मुख्य कारण ताण हेच असल्याचे एम्समधील मनोदोष चिकित्सा विभागीत प्राध्यापक आणि या विषयाशी संबंधि अभ्यास प्रकल्पाचे मुख्य संशोधक डॉ. राजेश सागर यांनी म्हटले आहे. तसेच मुलांमध्ये त्यांना घाबरवणे आणि धमकावणे या कारणांमुळे नैराश्य आणि चिंता विकार बळावत असल्याचे डॉ. सागर यांनी सांगितले.


          इतकेच नाही, तर सामाजिक संरचनेत होत असलेल्या बदलांमुळे देखील मानसिक आजार वाढत असल्याचे ते म्हणाले. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती असल्याने आपल्या समस्यांबाबत कुटुंबातील लोक घरातील इतर सदस्यांशी बोलत आपले मन हलके करत असत. आता विभक्त कुटुंब पद्धतीत हे शक्य होताना दिसत नाही.
 

मागे

उद्या कल्याण-डोंबिवली रेल्वेमार्गावर जम्बोब्लॉक
उद्या कल्याण-डोंबिवली रेल्वेमार्गावर जम्बोब्लॉक

       मुंबई - ऐन ख्रिसमसच्या दिवशी मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकात प....

अधिक वाचा

पुढे  

मद्यधुंद पार्ट्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी
मद्यधुंद पार्ट्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी

           ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागताकरीता पार्ट्यांच्या आय....

Read more