By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 05:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार आहे. या संदर्भात दिल्ली कोर्टाने नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे. दिल्ली कोर्टाने आधी दिलेल्या डेथ वॉरंटनुसार २२ जानेवारीला निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यात येणार होतं.
मात्र डेथ वॉरंटला आव्हान देण्यात आलं ज्यानंतर २२ तारखेचं डेथ वॉरंट रद्द करण्यात आलं होतं. आता दिल्ली न्यायालयाने नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे. या प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश याने राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळला आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. मात्र २२ तारखेला फाशी दिली जाणार नाही हे तेव्हा स्पष्ट झालं होतं.
2012 Delhi gang-rape case: A Delhi court issues fresh death warrant for convicts for 1st February, 6 am pic.twitter.com/hHvXo6Av1d
— ANI (@ANI) January 17, 2020
कारण राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर नव्याने डेथ वॉरंट जारी करण्यासाठी किमान १४ दिवसांचा अवधी द्यावा लागतो असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता. आता कोर्टाने नवं डेथ वॉरंट काढून १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जाईल असा निर्णय दिला आहे.
नवी दिल्ली - श्रीनगरमधील हजरतबल भागातून ५ दहशतवाद्यांना जम्मू-कश्म....
अधिक वाचा