By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 04:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने कुरापती चालूच ठेवताना बुधवारी गुजरातमधील आणखी 22 मच्छिमारांना अटक केली. त्यांच्या 4 नावाही जप्त करण्यात आल्या. संबंधित मच्छिमार काही दिवसांपूर्वी मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेले होते. त्यांनी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत अवैध शिरकाव केल्याचा कांगावा करत त्या देशाच्या यंत्रणेने त्यांना अटक केली. मात्र, त्यांना आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ पकडण्यात आले.
तशा प्रकारच्या आगळिकी पाकिस्तानकडून वारंवार केल्या जातात, असा आरोप गुजरातमधील मच्छिमारांच्या संघटनेने केला. याआधी 6 मे यादिवशी पाकिस्तानी यंत्रणेने 34 गुजराती मच्छिमारांना अटक केली होती. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत पाकिस्तानने अटक केलेल्या गुजरातमधील मच्छिमारांची संख्या 56 इतकी झाली आहे.
नवरा दारू पिऊन टाइट असल्याचं लक्षात येताच भर मांडवात नवर्या मुलीने लग्न म....
अधिक वाचा