ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतात फक्त 27 टक्के नागरिक घरात लॉकडाऊन, सर्व्हेत धक्कादायक माहिती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 25, 2020 07:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतात फक्त 27 टक्के नागरिक घरात लॉकडाऊन, सर्व्हेत धक्कादायक माहिती

शहर : देश

भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या 500 पेक्षा अधिक आहे. असे भंयकर चित्र देशात असूनही फक्त 27 टक्केच लोक आपल्या घरात बसत आहेत. तसेच सार्वजनिक जागांपासून लांंब राहत आहेत, अशी धक्कादायक माहिती एका सर्व्हेतून समोर आली आहे. हा सर्वे जगभरातील 22 देशांमधील 20 हजार लोकांमधून करण्यात आला आहे. हा सर्व्हे आयएनएस सी व्होटर गॅलप इंटरनॅशन असोसीएशन कोरोना ट्रॅकर 1 ने केला आहे.या सर्व्हेसाठी प्रत्येक देशतील लोकांसोबत गेल्या दोन आठवड्यात समोरा-समोर, टेलीफोनवर तर काही लोकांशी ऑनलाईन संपर्ककरुन ही माहिती मिळवली आहे.

या सर्व्हेतून स्पष्ट झाले की, “कोरोनापासून स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी केवळ 27 टक्के भारतीय घरात बसत आहेत. तसेच सार्वजनिक जागांपासून लांब राहत आहेत. तर 73 टक्के लोक स्वत:चा बचाव करत नाहीत.”

जगभरात केवळ 45 टक्के लोक स्वत:ची काळजी घेत आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे सहा हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथे 93 टक्के लोक आपल्या घरात आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी जाण्यास ते टाळत आहेत, असा दावाही या सर्व्हेतून करण्यात आला आहे.

इटलीनंतर ऑस्ट्रियामध्ये सर्वाधिक लोक घरात बसत आहेत. ऑस्ट्रियामध्येही सर्वाधिक म्हणजे 90 टक्के लोक आपल्या घरात बसत आहेत. कुणीही व्यक्ती रस्त्यावर फिरताना दिसत नाही. तर दुसरीकडे तुर्कीमध्ये केवळ 11 टक्के लोक स्वत:ची काळजी घेत आहेत, असे या सर्व्हेतून समोर आले आहे.

दरम्यान, हा आजार सर्वत्र पसरु नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावलं उचलली जात आहेत. लोक ऐकत नसल्यामुळे लॉकडाऊन तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाईही केली जात आहे. पण तरीही अनेकजण रस्त्यावर फिरत असल्याचे या सर्व्हेतून समोर आलं आहे.

मागे

कोरोना नियंत्रणासाठी राज्यात 22,118 खोल्यांची सज्जता, 55,707 खाटांची सोय : अशोक चव्हाण
कोरोना नियंत्रणासाठी राज्यात 22,118 खोल्यांची सज्जता, 55,707 खाटांची सोय : अशोक चव्हाण

कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम वि....

अधिक वाचा

पुढे  

लॉकडाऊन' नंतर मुंबईतील सोसायट्यांचा महत्वाचा निर्णय
लॉकडाऊन' नंतर मुंबईतील सोसायट्यांचा महत्वाचा निर्णय

कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान मांडल आहे. मुंबईतही कोरोनाबाधित रूग्णांचा आ....

Read more