By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 25, 2020 05:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
जम्मू - गेले कित्येक दिवस बंद असेलेली मोबाईल इंटरनेट सेवा अखेर शुक्रवारी रात्री जम्मू-काश्मीर खोर्याईत सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून काही जिह्यामध्ये तब्बल ५ महिन्यांनंतर इंटरनेट सेवा सुरू केली आहे. परंतु काही प्रमाणात इंटरनेटवर प्रतिबंध करण्यात येणार आहे. याद्वारे ग्राहकांना ३०१ वेबसाईट्सच पाहता येणार आहे. तसेच सोशल मीडियासाठी वापरली जाणारी ऍप्स मात्र नागरिकांना वापरता येणार नाहीत.
जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या गृह विभागाने एक अधिसूचना जारी केली होती. मोबाईल फोनवर २ जी स्पीडसोबत इंटरनेट सुविधा २५ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच नागरिकांना सर्च इंजिन, बँकींग, शिक्षण, बातम्या, प्रवास, सुविधा आणि रोजगार यासंबंधित वेबसाईट्सचाच वापर करता येणार आहे. पोस्टपेड आणि प्रीपेड सेवा वापरणा-यात ग्राहकांना आता डेटा सेवेचा लाभ घेता येणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत मोबाईलवर २ जी इंटरनेटची सुविधा देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्मा याच्याव....
अधिक वाचा