ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 13, 2020 12:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण

शहर : पुणे

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील पाच संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. आता राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी. वारंवार साबणाने हात धुवावेत, हस्तांदोलन करु नका आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज झाला आहे. वायसीएममध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून तो सज्ज केला आहे. तर सात खासगी रुग्णालयात ४८ आयसोलेशन बेड उपलब्ध केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सक्षमपणे तयार असून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.

वायसीएममध्ये दाखल केल्या गेलेल्या पाच जणांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी तीन जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यातून दुबईला जे प्रवाशी गेले होते. त्यापैकी हे प्रवासी आहेत. दुबईतून परत आल्यानंतर विमानतळावरुन टॅक्सीने थेट हे प्रवासी घरी परतले होते. दरम्यान, ज्या टॅक्सीतून हे परतले त्या टॅक्सी चालकालाही कोरोनाची बाधा झाली आहे. तो मुंबईचा आहे. मुंबईतही आज आणखी एक रुग्ण आढळून आला आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १५वर पोहोचली आहे. पहिले दोन कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळले. त्यानंतर पुण्यात रुग्ण संख्या नऊवर पोहोचली. यात पिंपरी-चिंचवडमध्ये तीन रुग्ण आहेत. मुंबईत चार, ठाण्यात एक आणि पुण्यात नऊ असे एकूण १५ रुग्ण राज्यात झाले आहेत.

मागे

हिंदुजा रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तपासणी
हिंदुजा रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तपासणी

संपूर्ण जगात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण मुंबईत सापडला ....

अधिक वाचा

पुढे  

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या तडाख्यात जगातील अनेक नामां....

Read more