By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 03:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
12 हून अधिक तास कराव्या लागणार्या कामाला ब्रेक लावत पोलीस अंमलदारांच्या सुरू झालेल्या आठ तास डयुटीला यशस्वी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. काही पोलीस ठाणी वगळता शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आठ तास डयुटीचे काम सुरळीत सुरू आहे.
पोलिसांचे कामाचे तास, त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम यामुळे पोलिसांची डयुटी आठ तासांची करा, अशी आग्रही मागणी पोलीस कुटुंबीयांची होती. या मागणीची गंभीर दखल घेत तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर देवनार, चेंबूर या पोलीस ठाण्यांत आठ तास डयुटीला सुरुवात केली. अंमलदार रवींद्र पाटील यांनी तयार केलेल्या अचूक आराखडयानुसार गणेशोत्सव व बकरा मंडी हे एकाच वेळेला असतानाही तेथे आठ तास डयुटी यशस्वी पार पडली. त्यामुळे आयुक्तांनी हळूहळू विविध पोलीस ठाण्यांत आठ तासांची डयुटी सुरू केली. 94 पैकी 91 पोलीस ठाण्यांत आज आठ तासांची डयुटी सुरू असून त्याला रविवारी तीन वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाली. विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या आठ तास डयुटीतून प्रेरित होऊन रेल्वे पोलीस दलातही आठ तास डयुटी सुरू करण्यात येणार आहे.
प्रिन्स हॅरीची पत्नी डचेज ऑफ ससेक्स मेगन मर्केल हिला मुलगा झाला आहे. सोमवार....
अधिक वाचा