By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 12:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बीड
नोव्हेंबर महिन्यात राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना जगाचा पोशिंदा बळीराजा मात्र जगण्यासाठी संघर्ष करत होता. महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एका महिन्यात इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची गेल्या चार वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. २०१५ मध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं होतं. यावेळी अनेकदा आत्महत्येचा आकडा ३०० हून अधिक असायचा.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं लक्षात येतं. अवकाळी पावसामुळे राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तसंच अवकाळी पावसामुळे जवळपास ७० टक्के पिकांचं नुकसान झालं. याआधी २०१५ मध्ये ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर सुरू असलेल्या सत्तानाट्यादरम्यान राज्यातला शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत होता. जवळपास ७० टक्के खरीप पीक अवकाळी पावसामुळं उद्ध्वस्त झाला.
ऑक्टोबर महिन्यात १८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. ही संख्या नोव्हेंबरमध्ये वाढली. एकट्या मराठवाड्यात नोव्हेंबर महिन्यात १२० शेतकरी आत्महत्यांची नोंद झालीय, तर विदर्भात ११२ घटनांची नोंद झालीय.
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रानंतर केरळचा चित्ररथाचा प्रस्ताव ....
अधिक वाचा