By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2019 01:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कुलाबा ते सिप्झ या ‘मेट्रो ३’ मार्गासाठी आरेतील अडीच हजार झाडे कापण्याचा वाद अद्याप शमलेला नसतानाच आता डी. एन. नगर ते दहिसर या ‘मेट्रो २ ए’ मार्गासाठी तब्बल ३०० झाडे काढावी लागणार आहेत. अंधेरी आणि कांदिवली, दहिसरमधील तब्बल १५४ झाडे कापावी लागणार आहेत. तर १५० झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणकडे तसा अर्ज पाठवला आहे.
‘मेट्रो ३’च्या कारशेडसाठी आरे वसाहतीतील झाडे कापण्यावरून मोठा वाद उसळला होता. त्यात आता ‘मेट्रो २ ए’साठी झाडे काढण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणकडे आला आहे. या मार्गाचे व्यवस्थापक ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ असून त्यांनी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणकडे तसा अर्ज पाठवला आहे. त्यानुसार डी. एन. नगर ते ओशिवरा नालादरम्यानची ३१ झाडे कापावी लागणार आहेत, तर इथली ८८ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. तसेच, दहिसरमधील ७० झाडे कापावी लागणार आहेत, तर ४१ झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहेत. या मार्गासाठी कांदिवलीतील लालजी पाडा ते महावीर नगर जंक्शनमधील ५३ झाडे कापावी लागणार आहेत, तर २१ झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहेत. वृक्ष प्राधिकरणाने ही झाडे हटवण्याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. ८ सप्टेंबरला हरकती व सूचनांवर उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.
दोन मार्गाचे प्रस्ताव परत पाठवले
कासारवडवली ते वडाळा (मेट्रो ४) आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (मेट्रो ६) या दोन मेट्रो मार्गिकांमधील १८२१ झाडे हटविण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र या झाडांकरिता ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’द्वारे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये त्रुटी व विसंगती आढळून आल्याने ते प्राधिकरणाला यापूर्वीच परत पाठवण्यात आले आहेत. प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि प्रस्तावातील झाडांच्या आकडेवारीतील विसंगती, मार्गात अडथळा नसलेली झाडे तोडणे असे आक्षेप कांजुरमार्ग, भांडुप येथील नागरिक, विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनी केले आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची र....
अधिक वाचा