ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

३६ केंद्रीय मंत्री उद्यापासून जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 12:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

३६ केंद्रीय मंत्री उद्यापासून जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

शहर : jammu

       श्रीनगर - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केलं गेलं. त्यांनतर आता पाच महिने लोटले असून तेथील सरकार सर्व काही सुरळीत चालू असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये काहीच सुरळीत नसल्याचा दावा विरोधीपक्ष सरकारला करीत आहेत. राज्यात संपूर्णपणे इंटरनेटसेवा अजूनही सुरळीत नाही. अनेक नेते आजही नजरकैदेत आहेत. असे आरोप-प्रत्यारोप चालू असल्याकारणाने मोदी सरकारचे ३६ मंत्री १८ ते २५ जानेवारीदरम्यान जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार असून तेथील चौकशी करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

       ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तानुसार सर्व मंत्री जम्मू-काश्मीरच्या विविध भागात भेट देणार असून, कलम ३७० हटवल्यानंतरची परिस्थिती काय आहे, याविषयी तेथील स्थानिक नागरिकांकडून जाणून घेणार आहेत. शिवाय सरकारमार्फत केल्या जाणाऱ्या विकासकामांची माहितीही देणार आहेत. यामुळे तेथील नागरिकांनाही दिलासा मिळेल आणि आलेल्या प्रतिक्रियांवर सरकारला योग्यरीतीने सुविधा राबवता येतील. 

       या दौऱ्यादरम्यान, कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद आणि मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांच्यासह ५ मंत्री काश्मीर खोऱ्यात असणार आहेत. तसेच अन्य सर्व मंत्री जम्मूमध्ये जाऊन प्रचार-प्रसार करणार आहेत. मोदी सरकारचे हे सर्व मंत्री दोन्ही विभागातील विविध जिल्ह्यांत २४ जानेवारीपर्यंत राहतील व तेथील स्थानिकांच्या समस्या जाणून घेतील. 

      दरम्यान, विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावरही टीका केली आहे. सरकार आधी कायदा संमत करुन घेते आणि मग नागरिकांकडून त्याला समर्थन मागते, हा मोदी सरकारचा नवीन डाव आहे, असं विरोधकांनी म्हटलं आहे. तर भाजपकडून हा विकास कामांसाठी जम्मू-काश्मीर दौरा असल्याचं सांगितलं जात असून, याबाबत राजकारण न करण्याचं आवाहन करण्यात आलं  आहे. आता या दौऱ्यादरम्यान जम्मू-कश्मीर मधील स्थानिक लोकांच्या समस्या आणि सुविधांवर सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. 

मागे

इस्रोकडून ‘GSAT-३०’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 
इस्रोकडून ‘GSAT-३०’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 

      नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो)  ‘GSAT-३०’ या दू....

अधिक वाचा

पुढे  

यंदा हापूस बाजारात उशिराने दाखल होणार
यंदा हापूस बाजारात उशिराने दाखल होणार

       रत्नागिरी - यावर्षीच्या हवामान बदलाचा चढ-उतार पाहता पिकांना चांग....

Read more