By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 28, 2021 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय वायूदलाच्या सामर्थ्यात आणखी भर पडली आहे. फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेली आणखी 3 राफेल विमानं (Rafale jet) बुधवारी रात्री भारतात दाखल झाली.
राफेल विमानांची ही तिसरी बॅच आहे. काही तासांपूर्वी या विमानांनी फ्रान्समधून उड्डाण केले होते. त्यानंतर राफेल विमानांनी 7000 किलोमीटरचा पल्ला नॉनस्टॉप पार केला. दरम्यानच्या काळात विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्यात आले. हे इंधन भरण्यासाठी यूएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टॅकरसाठी वायूदलाकडून आभार मानण्यात आले आहेत.
यापूर्वी पाच विमानांची पहिली बॅच भारतात 28 जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती. भारताने फ्रान्सकडून एकूण 36राफेल विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात तीन बॅचमध्ये एकूण नऊ विमानं दाखल झाली आहेत. येत्या मार्चमध्ये तीन आणखी राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमानं येतील. अशाप्रकारे पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत भारतीय वायूदलाच्या ताफ्यात 21 राफेल विमाने असतील.
प्रजासत्ताक दिनी राजपथावर राफेल विमानांचं शक्तीप्रदर्शन
प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनावेळी राफेल विमानाकडून हवाई प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्याचा वेग ताशी 900 किलोमीटर होता. याठिकाणी त्याने चार्ली स्टंटही केले, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
3rd batch of 3 Rafale aircraft landed at an IAF base a short while ago. They flew over 7000Km with in-flight refuelling. The aircraft got airborne earlier today from Istres Air Base in France. IAF deeply appreciates the tanker support provided by UAE Air Force: Indian Air Force pic.twitter.com/3gy5x7yoHa
— ANI (@ANI) January 27, 2021
राफेल विमानाची वैशिष्ट्ये
* राफेल हे 2 इंजिन असलेलं अनेक कामं करू शकणारं मध्यम आकाराचं लढाऊ विमान
* लांब असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याच्या दृष्टीनं राफेलची निर्मिती
* हवेतून मारा करणं, हवेतल्या हवेत इंधन भरणं, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणं त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता
* हवेत 150 किलोमीटरपर्यंत तर हवेतून जमिनीवर 300 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची अण्वस्त्रसज्ज राफेलची क्षमता
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एफडीआर घोटाळ्याप्रकरणी महापालिकेची फसवणू....
अधिक वाचा