ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 07:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार

शहर : मुंबई

      अहमदनगर - नगर-सोलापूर महामार्गावर आंबिलवाडी फाट्याजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत. अरुणराव बाबुराव फुलसौंदर (वय ५५), अर्जुन योगेश भगत (वय १२), ताराबाई शंकर भगत (वय ६०) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला असून हे सर्व जण नगरचे आहेत. तर, अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.


         अक्कलकोट-मालेगाव ही एसटी (क्र. एमएच १४, बीटी ३३३७) बस नगरकडे येत होती. या बसची व नगरकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारची नगर-सोलापूर महामार्गावरील आंबिलवाडी फाट्याजवळ समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला.


          या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यु झाला असून हे तिघेही नगरचे रहिवासी आहेत. तर, अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी अपघातस्थळी धाव घेतली. नगर तालुका पोलिस स्टेशनला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
 

मागे

एसबीआयच्या ग्राहकांना पैसे काढताना द्यावा लागणार ओटीपी 
एसबीआयच्या ग्राहकांना पैसे काढताना द्यावा लागणार ओटीपी 

        मुंबई - नवीन वर्षांची ग्राहकांसाठी एसबीआयने (SBI) एक चांगली बातमी ....

अधिक वाचा

पुढे  

मराठा महासंघ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा
मराठा महासंघ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

सर्वाना हवी हवीशी वाटणारी मराठा महासंघ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा रविवार २९ ....

Read more