By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 17, 2020 02:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना Kovid 19 व्हायरस भारतात ही दाखल झाल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत ३ जणांचा बळी गेला आहे. कर्नाटक, दिल्लीनंतर मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. आतापर्यंत भारतात corona चे १२६ रुग्ण आढळून आले आहेत. भारतात कोरोना दुसऱ्या स्टेजला पोहोचला आहे. भारतात येत्या ३० दिवसात यावर नियंत्रण मिळवण्यात आलं नाही तर हा तिसऱ्या स्टेजला जाईल.
कोरोना व्हायरसमध्ये पहिला टप्पा थोडा वेगळा आहे. भारतात हा आजार स्थानिक स्थरावर अजून पोहोचलेला नाही. हा आजार बाहेरुन आला आहे. एका व्यक्तीमुळे तो परदेशातच दुसऱ्या व्यक्तीला झाला.
दुसऱ्या स्टेजला कोरोना व्हायरस अशा लोकांमध्ये आढळला आहे. जे दुसऱ्या देशातून फिरुन आले आहेत. म्हणजे अजूनही हा आजार स्थानिक लोकांकडून पसरलेला नाही. भारत सध्या याच स्टेजला आहे. पण तिसऱा स्टेज लांब नाही. त्यामुळे भारताला अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
तिसऱ्य़ा स्टेजला हा आजार भारतात असलेल्या व्यक्तीमुळे पसरु शकतो. म्हणजे स्थानिक व्यक्तींकडून जेव्हा हा आजार दुसऱ्या व्यक्तींना होण्यास सुरुवात होते. तेव्हा हा तिसऱ्य़ा स्टेजला पोहोचला असं म्हणतात. तिसरी स्टेज म्हणजे धोक्याची घंटा आहे. भारतात तिसऱ्या स्टेजला जावू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करत आहे. कारण तसं झालं तर हा व्हायरल देशातील वातावरणानुसार स्वतःला तसं घडवून घेतो. त्यानंतर यावर नियंत्रण मिळवणं अवघड होऊन जाईल.
तिसऱ्या स्टेजला सरकारला मॉल, दुकानं, शाळा आणि गर्दीची ठिकाणी सक्तीने बंद करावे लागतील. अन्यथा हा व्हायरस इतक्या मोठ्या प्रमाणात पसरेल की त्याला हाताळणं अवघड होऊन जाईल.
चौथा स्टेज म्हणजेच महामारी. जेव्हा एखादा आजार देशात भौगोलिकरित्या पसरतो. तेव्हा तो चौथ्या स्टेजला पोहोचतो. जसं आता चीन, इटली, इराण आणि स्पेनमध्ये झालं आहे.
भारतात ३० जानेवारीला पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत देशात १२६ रुग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती मजबूत आहे. कारण तीन आठवड्याआधी इटलीमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. आता सध्या इटलीमध्ये कोरोनाचे २१ हजार हून अधिक रुग्ण समोर आले आहेत.
भारत सरकार परदेशातून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे. ज्या भारतील लोकांना देशात आणलं जात आहे. त्यांना तपासणी करुनच घरी सोडलं जात आहे. पण येणारे १५ दिवस भारतासाठी महत्त्वाचे असणार आहेत.
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला. देशाचं ....
अधिक वाचा