ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

टरबूज खाल्याने ४० जणांना विषबाधा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 08, 2019 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

टरबूज खाल्याने ४० जणांना विषबाधा

शहर : नाशिक

टरबूज खाल्ल्यानंतर ४० ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील वसंतनगर गावात झाली आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये महिला व लहान मुलांचा ही समावेश आहे. ग्रामस्थांना अचानक उलटी व जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने बहुतेक रुग्णांनी जातेगाव, बोलठाण व नांदगावच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले.

सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास त्रास जास्त जाणवू लागला. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने ग्रामस्थांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाने यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. डॉ.ससाणे यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित परिचारिका, परिचर व आरोग्य सेवक यांना गावात पाठवून रुग्णांवर प्राथमिक उपचार केले. जास्त त्रास होत असलेल्या रुग्णांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. ग्रामस्थांना जे टरबूज खाल्ल्याने  विषबाधा झाली त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

मागे

भीमा-कोरेगाव आरोपींच्या सुटकेची मागणी
भीमा-कोरेगाव आरोपींच्या सुटकेची मागणी

भीमा-कोरेगाव हिंसाचारातील आरोपींची सुटका करण्याची मागणी गैर सरकारी संघटन....

अधिक वाचा

पुढे  

केरळमध्ये मान्सून ची सुरवात
केरळमध्ये मान्सून ची सुरवात

सर्वांना उत्सुकता असलेल्या मान्सूनचे अखेर भारतात आगमन. केरळ मध्ये मान्सून ....

Read more