By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2020 11:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
लेबनॉनची राजधानी बेरूत येथे झालेल्या स्फोटात जर्मनीच्या राजदूतामधील महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हेईको मास म्हणाले की, परराष्ट्र मंत्रालयात काम करणार्या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला स्फोटास्थळी असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. बेरूत बंदरात झालेल्या विनाशकारी स्फोटात मरण पावणारी ही पहिली जर्मन महिला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेरूत स्फोटात पाच भारतीयही जखमी झाले आहेत. पाचही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे ही दिलासादायक बाब आहे. बेरूत स्फोटात आतापर्यंत 135 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोकं जखमी आहेत. संपूर्ण बंदर व परिसर नष्ट झाला आहे.
दरम्यान, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन बेरूत दाखल झाले आहेत. लेबनॉनला मदत करण्यासाठी, फ्रान्स आणि इतर देशांनी आपत्कालीन मदत आणि बचावासाठी पथके पाठवले आहेत. आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या लेबनॉनला आता पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीची आवश्यकता भासणार आहे.
लेबनीज सैन्य दलाचे बुलडोझर हा ढिगारा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी बेरूत बंद पडलेल्या बंदराच्या आसपासचे रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. लेबनीज सरकारने विनाशकारी स्फोटाची चौकशी करण्याचे आणि बंदर अधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
मंगळवारी बेरूतमध्ये हा स्फोट झाला होता. बंदरात अमोनियम नायट्रेट ठेवण्यात आले होते. ज्याचा मोठा स्फोट आहे. अमोनियम नायट्रेटमध्ये झालेल्या स्फोटाचा परिणाम शंभर किलोमीटरपर्यंतच्या परिसरावर दिसून आला. या अपघातात आतापर्यंत 135 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 5000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच अने....
अधिक वाचा