By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 04:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
नवी दिल्ली - श्रीनगरमधील हजरतबल भागातून ५ दहशतवाद्यांना जम्मू-कश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांनी २६ जानेवारीला अर्थात प्रजासत्ताक दिनी मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत. या दहशतवाद्यांमध्ये एजाज अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद चिकला, साहिल फारूक गोजरी आणि नसीर अहमद मीर यांची नावे समोर आली आहेत. पकडलेले दोन दहशतवादी हे काश्मीरमधील दोन ग्रेनेड हल्ल्यात सहभागी होते. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे.
मुंबई - बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसोबतच्या वर्षभरासाठीच्या क....
अधिक वाचा