By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 10:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
आर्थिक चणचणीमुळे डबघाईला आलेल्या बीएसएनएलला सावरण्यासाठी बीएसएनएलने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना तयार केली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयातही दोन वर्षांची कपात करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावच बीएसएनएलने केंद्राला सादर केला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिल्यास सुमारे ५४ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मध्ये १.७६ लाख कर्मचारी आहेत, तर एमटीएनएलमध्ये २२ हजार कर्मचारी आहेत. येत्या पाच-सहा वर्षांत एमटीएनएलमधील १६ हजार आणि बीएसएनएलमधील ५० टक्के कर्मचारी निवृत्त होणार आहेत. बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील स्वेच्छानिवृत्तीमुळे अनुक्रमे ६ हजार ३६५ कोटी आणि २ हजार १२० कोटींची बचत होणार आहे. ही स्वेच्छानिवृत्ती योजना गुजरात मॉडेलच्या धर्तीवर आहे. गुजरातमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण करण्यात आलेल्या प्रत्येक सेवा वर्षांसाठी ३५ दिवसांचे वेतन तसेच निवृत्तीपर्यंत राहिलेल्या वर्षांसाठी २५ दिवसाचे वेतन देण्यात आले आहे. सध्या बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. त्यात दोन वर्षांची कपात करून ते ५८ वर्षे एवढे करण्यात येणार आहे. व्हीआरएस आणि निवृत्ती वयातील कपातीमुळे बीएसएनएलमधील एकूण ५४ हजार ४५१ कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे.
मुंबईतल्या वाढत्या लोकसंख्ये सोबतच त्यांना मिळणाऱ्या वाहतुकीच्या पर्याय....
अधिक वाचा