ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जंगलात पुरला 5 फुटांचा मृत डॉल्फिन

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 07:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जंगलात पुरला 5 फुटांचा मृत डॉल्फिन

शहर : ठाणे

घोडबंदरमधील जंगलात पाच फुटांचा डॉल्फिन पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलांनी मृत डॉल्फिनचे काढलेले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याबाबत परिसरातील स्थानिकांनी वनाधिकार्‍यांना माहिती दिली. अधिकार्‍यांनी मुलांचा शोध घेतला. ज्या ठिकाणी डॉल्फिन पुरला होता, तेथे त्या मुलांना घेऊन गेले. अधिकार्‍यांनी डॉल्फिनचा मृतदेह ताब्यात घेऊन ठाण्यातील एसपीसीएमध्ये पाठवला. डॉल्फिनच्या मृत्यूचं कारण समजू शकलेलं नाही. पण जाळ्यात अडकल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, असं एसपीसीएमध्ये डॉक्टरांनी सांगितलं. ’डॉल्फिनच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, हे समजू शकलं नाही. तसंच डॉल्फिनच्या कुठेही जखमा झालेल्या नव्हत्या,’ असं ठाणे एसपीसीएच्या डॉ. नेहा शाह यांनी सांगितलं. आतापर्यंत आम्हाला काहीही संशयास्पद आढळलेलं नाही. मृत डॉल्फिनचे फोटो काढणार्‍या मुलांकडे चौकशी करणार आहोत, असं वनाधिकारी जितेंद्र रामगावकर यांनी सांगितलं.

मागे

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली पाहणी
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली पाहणी

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची पहा....

अधिक वाचा

पुढे  

श्रीलंकामध्ये पुन्हा गोळीबार...
श्रीलंकामध्ये पुन्हा गोळीबार...

श्रीलंकेत झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटानंतर स्थानिक सुरक्षा दलानं दहशतवा....

Read more