By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 12:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारतात 2020 च्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी 67,385 बालकांनी जन्म घेतला. युनीसेफकडून ही माहिती देण्यात आली आहे. जानेवारी 2020 जन्म घेतलेल्या बालकांची संख्या जगभरात सर्वाधिक आहे. लोकसंख्येत अव्वल स्थानी असलेल्या चीन मात्र दुसऱया स्थानी आहे.
युनीसेफच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण जगात 1 जानेवारी 2020 साली जगभरात 3 लाख 86 हजार मुले जन्माला आली. या जन्मदरात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल चीन असून तेथे जवळपास 44 हजार 760 मुले जन्माला आली. नायजेरियात 26,039 बालकांनी, पाकिस्तानात 13,020 बालकांनी, तर इंडोनेशियात 13,020 बालकांनी जन्म घेतला. अमेरिकेत या दिवशी 10,452 बालकांनी जन्म घेतला.
जन्म घेतलेल्या बालकांची संख्या विचारात घेतल्यास भारतात जन्माला आलेल्या बालकांची संख्या 17 टक्के इतकी आहे. दरम्यान, युनिसेफने 1 जानेवारी या दिवशी जन्माला आलेल्या बालकांसाठी स्वागताचा कार्यक्रम आयोजित करत शुभेच्छा दिल्या.
दिल्ली - राजधानी दिल्लीतील आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. गुरूव....
अधिक वाचा