ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पित्याच्या अस्थी घेऊन 7 मुलांनी केले मतदान

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 06:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पित्याच्या अस्थी घेऊन 7 मुलांनी केले मतदान

शहर : मुंबई

संध्याकाळी साडेपाच पर्यन्त महाराष्ट्रात ५३.४६ टक्के मात्द्न झाल्याचे दिसून आले. याचाच अर्थ असा की, सुमारे ५५ टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला नाही. मतदनाची टक्केवारी अशाप्रकारे घटत असताना काही भगत अपवादात्मक पण आदर्श निर्माण करणार्‍या घटनाही घडल्या. बदलापूर येथील वडवली गावात पांगळू झिपरु म्हात्रे यांचे कालच २० ऑक्टोंबरला निधन झाले. आज मतदानाच्या दिवशी त्यांच्या ७ मुलांनी सकाळी वडिलांच्या अस्थी गोळा केल्या आणि थेट घरी न जाता मतदान केंद्रात जाऊन त्यांनी मतदान ही केले.

खरे तर कुटुंबातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यावर १३ दिवस दुखवटा पाळला जातो. या काळात कुठेही बाहेर जात नाहीत. मात्र म्हात्रे कुटुंबातील ७ मुलांसह ५२ सदस्यांनी मतदान केले.

मागे

हरिग्राम येथील महिलांचा मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभाग
हरिग्राम येथील महिलांचा मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभाग

रायगड महिला व बालविकास कार्यालया तर्फे मतदान जनजागृती अभियानात हरिग्राम म....

अधिक वाचा

पुढे  

पीएमसी बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी
पीएमसी बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक गैरव्यवहारामुळे आणखी एकाचा नाहक मृत....

Read more