ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यात विज कोसळून दोन दिवसांत 7 जणांचा मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 03:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यात विज कोसळून दोन दिवसांत 7 जणांचा मृत्यू

शहर : मुंबई

गेल्या दोन दिवसामध्ये अवकाळी पाऊस आणि विज कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सटाणामध्ये विज कोसळल्याने पिंटू शिंदेचा मृत्यू झाला. पावसात भिजणार्‍या आपल्या बकर्‍यांना सोडण्यासाठी घरातून ते घरातून बाहेर पडले देवळा तालुक्यातील वाजगाव येथे राहणार्‍या हौसा कुंवर या वृद्ध महिलेचाही विज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. परभणीतील पाथरी गावात विज कोसळून दोन जणांचा बळी गेला आहे. तसेच विजेच्या तडाख्याने 40 मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. एक धनगरही या तडाख्यात जखमी झाला आहे. धनगर आपल्या मेंढ्यांना घेऊन एका झाडाखाली उभा होता. त्याचवेळी विज कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
येडगाव जुन्नर येथील भोरवाडी येथे महेश दशरथ भोर या युवकाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. महेश त्यांच्या अंगणात झोपले असताना अचानक पाऊस सुरु झाला. पाऊस सुरु झाल्याने घरात जात असतानाच वीज कोसळली. त्यातच 28 वर्षीय महेशचा होरपळून मृत्यू झाला. नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात महेशचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. 
नाशिकमधील मालेगाव येथे तुफान वादळी वार्‍यामुळे मालेगाव कॅम्प भागात एक झाडं पडल्याचीही घटना घडली. या घटनेत विकास अग्रवाल या 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच अमहदनगर जिल्ह्यातील शिर्डीपासून काही अंतरावर असलेल्या संगमनेर तालुक्यातील खराडी गावातही बाळासाहेब साबळे यांचा मृत्यू झाला आहे.

मागे

बेरोजगारीमुळे उस्मानाबादच्या तरुणांना कर्नाटकमध्ये शोधावी लागते वधू...
बेरोजगारीमुळे उस्मानाबादच्या तरुणांना कर्नाटकमध्ये शोधावी लागते वधू...

उस्मानाबाद जिल्ह्यातील कौडगाव… या गावात किमान शंभर मुल लग्नाच्या वयाची ....

अधिक वाचा

पुढे  

गडचिरोलीमध्ये भीषण अपघात 3 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी
गडचिरोलीमध्ये भीषण अपघात 3 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

गडचिरोलीतील आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ आज सकाळी 11  वाज....

Read more