By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 06, 2020 06:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
राज्यात कोरोनानं हाहाकार माजवलेला असून, दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. राज्य सरकारनं कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालवले असले तरी अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. अनेक देशांनी लस बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारतातल्या सीरम इन्स्टिट्युनंही ऑक्सफोर्डच्या मदतीनं लशीची चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. आता भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा डोस आजपासून देण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे नागपुरातील गिल्लूरकर रुग्णालयात आजपासून 50 स्वयंसेवकांना दुसरा डोस देण्यात येत आहेत. यात आठ मुलं, 5 ज्येष्ठ नागरिक आणि 22 महिलांचा समावेश आहे. लवकरच तिसरा टप्पाही सुरू होण्याची शक्यता आहे.
कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला डोस दिल्यानंतर, स्वयंसेवकांचं निरीक्षण करण्यात आलं, यात कुणावरही विपरीत परिणाम झालेला नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील दुसरा डोस आजपासून देण्यास सुरुवात झालीय. तत्पूर्वी मुंबईतील केईएम रुग्णालयात कोरोना लस कोव्हिडशील्डचे मानवी परीक्षण सुरू झाले. (Corona Vaccine human trial). शनिवारी तीन लोकांवर लशीचे परीक्षण केले गेले, असं रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी सांगितले होते. लशीच्या परीक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे
“आम्ही आतापर्यंत 13 लोकांवर स्क्रीनिंग केली आहे. यामध्ये 10 लोकांची स्क्रीनिंग पूर्ण झाली आहे”, असं रुग्णालयाच्या डीन देशमुख यांनी सांगितले होते. पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटिश स्वीडिश फार्मा कंपनी Astra Zeneca सोबत कोव्हिड 19 लस तयार करण्यासाठी भागीदारी केली आहे. ही लस ऑक्सफोर्ड यूनिव्हिर्सिटीमध्ये तयार केली आहे. जिथे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मित मानवी परीक्षण केले जाणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे कोव्हिडशील्ड लस विकसित केली आहे आणि भारतातील पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट तयार करत आहे.
पीजीआय चंदीगडमध्येही सुरू कोरोना लशीची ट्रायल
पीजीआय चंदीगडमध्येही कोरोना लशीच्या शेवटच्या टप्प्यातील ट्रायल प्रक्रिया सुरू आहे. देशात या लशीच्या ट्रायलसाठी 17 संस्था एकत्र आल्या आहेत. पीजीआयचाही यामध्ये समावेश आहे. डाटा सेफ्टी अँड मॉनिटरिंग बोर्ड नवी दिल्लीवरून परवानगी मिळाल्यानंतर पीजीआयमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. ट्रायलसाठी पीजीआयमध्ये 10 स्वयंसेवकांची निवड केली आहे. सर्वांची तपासणी केली आहे. हे सर्व जण ट्रायलसाठी फिट असल्याचे स्पष्ट झालं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा के....
अधिक वाचा