By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 12, 2019 02:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
यावर्षी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पद्म पुरस्कारासाठी 9 महिला खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे. तर देशाच्या दुसर्या सर्वोच्च पद्म विभूषन पुरस्कारासाठी बॉक्सिंगमध्ये 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या मेरी कॉम हीच नाव प्रस्तावित करणात आल आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच एका महिला खेळाडूच्या नावाची पद्म विभूषन पुरस्कारासाठी शिफारस करण्यास आली आहे.
मेरी कोमला 2013 मध्ये पद्मभूषण आणि 2006 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर पद्म विभूषन पूरस्कार बुद्धिबळपट्टू विश्वनाथ आनंदला 2007 मध्ये क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकरला 2008 मध्ये आणि गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांना 2008 मध्ये मरणोत्तर देण्यात आला.
आता पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या महिला खेळाडुंमध्ये बॅडमिंटनपट्टू पी. व्ही. सिंधु क्रिकेटपट्टू हरमणप्रीत कौर हॉकीपट्टू रानी रामपाल ,माजी शूटर सुमा शिरूर आणि गिर्यारोहक जुळ्या बहिणी ताशी आणि नुंगाशी मलिक यांचा समावेश आहे.
केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करुन वाहतुकीचे नियम मोडण....
अधिक वाचा