ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डोंबिवलीजवळ धावत्या ट्रेनमधून पडून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 07:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डोंबिवलीजवळ धावत्या ट्रेनमधून पडून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू

शहर : मुंबई

मुंबई -  मध्य रेल्वेवरील लोकलगर्दीनं आणखी एका 22 वर्षीय तरुणीचा बळी घेतला आहे. डोंबिवली-कोपरदरम्यान आज सकाळी ही घटना घडली. गर्दीच्या रेट्यामुळं धावत्या ट्रेनमधून पडून तरूणीचा मृत्यू झाला. चार्मी पासड (२२) असं या तरुणीचं नाव आहे. 

देसलेपाडा-भोपर येथील रहिवासी चार्मी हिनं आज सकाळी साधारण नऊच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरून मुंबईच्या दिशेने जाणारी जलद ट्रेन पकडली. डोंबिवली स्थानकात सकाळच्या वेळेस प्रचंड गर्दी होती. गर्दीमुळं तिला कशीबशी दरवाजाजवळ उभं राहायला जागा मिळाली. तिनं आत शिरण्याचा प्रयत्न केला. पण तो शेवटपर्यंत फोल ठरला. ट्रेन कोपरजवळ पोहोचली असता, गर्दीच्या रेट्यामुळं तिचा हात सुटला आणि ती ट्रेनमधून खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाली.

या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणीला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. या लोकलगर्दीनं आणखी एका तरुणीचा बळी गेला आहे. रेल्वे प्रशासन काही उपाययोजना करणार का? असा सवाल मुंबईकरकांडून विचारला जात आहे.
 

मागे

आरे वृक्षतोडवर  सुप्रीम कोर्टात जानेवारीमध्ये सुनावणी
आरे वृक्षतोडवर सुप्रीम कोर्टात जानेवारीमध्ये सुनावणी

नवी दिल्ली-  मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात दाखल याचिकांवर आता स....

अधिक वाचा

पुढे  

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल

               मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या पीएमएलए ....

Read more