ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जेएनपीटीत 45 हेक्टर क्षेत्रावरील सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा शुभारंभ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2020 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

जेएनपीटीत 45 हेक्टर क्षेत्रावरील सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा शुभारंभ

शहर : रायगड

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये (जेएनपीटी) सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा शुभारंभ करण्यात आला आहे. निर्यात कंटेनरसाठीचा खर्च आणि वेळेची बचत करण्यात मदत करणार्‍या डायरेक्ट पोर्ट एन्ट्रीला चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम आहे. दरम्यान जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामधील सुविधांचा आढावा घेतला.

हा पार्किंग प्लाझा तब्बल 45 हेक्टर क्षेत्रात पसरला आहे. तसेच या पार्किंग प्लाझाची एकाचवेळी 1,538 ट्रॅक्टर ट्रेलर पार्क करण्याची क्षमता आहे. अशा प्रकारची योजना आखणारे जेएनपीटी हे भारतातील एकमेव बंदर आहे. दरम्यान पूर्वीच्या ठिकाणी निर्यात कंटेनर वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलर्सच्या पार्किंगचे एकत्रीकरण करण्यासाठी प्लाझा पूर्णपणे तयार केला आहे.

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) कस्टम सुविधांसह कंटेनर ट्रॅक्टर ट्रेलर्ससाठी एक नवीन सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा (सीपीपी) सुरू केला आहे. व्यवसाय सुलभतेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या अत्याधुनिक सुविधा आणि सेवा तरतूदींसह कस्टमद्वारे दस्तऐवज प्रक्रिया सोपी होईल.

मागे

नोव्हेंबरमध्ये येत आहेत मोठे उत्सव; आपली कामे उरकून घ्या, बँका १५ दिवस बंद राहणार
नोव्हेंबरमध्ये येत आहेत मोठे उत्सव; आपली कामे उरकून घ्या, बँका १५ दिवस बंद राहणार

नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे सण असणार आहेत. दिवाळी लक्ष्मीपुजन आणि त्यानंत....

अधिक वाचा

पुढे  

कांद्यांची कोंडी फुटली! नाशिकमध्ये लिलाव सुरू, मिळाला 'इतका' भाव
कांद्यांची कोंडी फुटली! नाशिकमध्ये लिलाव सुरू, मिळाला 'इतका' भाव

अखेर चार दिवसांनंतर कांदा कोंडी आज फुटली असून कांद्याचे लिलाव सुरू झाले. का....

Read more