By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 03:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जळगाव
उस्मानाबाद - ठाकरे सरकारने फडणवीस सरकारच्या अजून एका योजनेला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला राज्य सरकारने ब्रेक लावला आहे.
सरकारने नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिह्यातील जलयुक्त शिवारच्या कामांना निधी न देण्याचे आदेश दिले आहेत. जर कोणत्याही अधिकाऱयाने जलयुक्त शिवारच्या कामाला पैसे दिले तर तो आर्थिक गैरव्यवहार म्हणून कारवाई होणार आहे. करायचीच असतील तर जलयुक्तची कामे रोजगार हमीतून करण्यासाठी मुभा असेल.
दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वात आधी मुंबईच्या आरेमधील मेट्रो कारशेडला स्थगिती देण्यात आली. यानंतर बुलेट टेन रोखण्याची चर्चा सुरु झाली. पाणी पुरवठय़ाच्या योजना रेखल्याचा आरोप झाला. मग मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं नामकरण बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने झालं. आता ठाकरे सरकारने जलयुक्त शिवारच्या कामाला ब्रेक लावला आहे.
एसबीआय, एचडीएफसी, एक्सिस, बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय अशा दे....
अधिक वाचा