By Sudhir Shinde | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 06:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chitradurga
कर्नाटक - देशभरामध्ये सध्या कांद्याच्या वाढलेल्या दरांनी सामान्यांच्या डोळ्यात पाणी येते आहे. एकीकडे कांद्यामुळे सामान्य नागरिक हैराण झालेले असतानाच कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील एक शेतकरी मात्र या कांदा दरवाढीमुळे महिन्याभरात करोडपती झाला आहे. या शेतक-याचे नाव मल्लिकार्जुन असून ते कर्जाच्या बोजाखाली अडकलेले होते.
मात्र, झटक्यात कांद्याचे दर वाढत असतानच मल्लिकार्जून यांनी अकाळी पावसाचा धोका पत्करून कांद्याचे पीक लावले. विशेष म्हणजे यासाठीही त्यांनी कर्ज काढलं होतं. “जर हे पिक वाहून गेलं असतं किंवा कांद्याचे दर पडले असते तर माझ्यावरील कर्ज अनेक पटींनी वाढले असते. मात्र तसं काहीही झालं नाही आणि कांद्याचं पीक घेण्याच्या या निर्णयामुळे माझ्या कुटुंबाचं नशिबच पालटलं,” असं मल्लिकार्जून यांनी माध्यमांशी बोलताना संगितले.
मल्लिकार्जून यांनी २४० टन कांद्याचे (म्हणजेच २० ट्रक भरतील इतका कांदा) उत्पादन घेतलं. हा एवढा कांदा त्यांनी २०० रुपये प्रती किलो दराने विकला. मल्लिकार्जून यांनी १५ लाखांची गुंतवणूक केली होती. आपल्याला पाच ते १० लाख निव्वळ नफा होईल अशी अपेक्षा मल्लिकार्जून यांना होता. मात्र कांदा लावण्याच्या या निर्णयामुळे त्यांचे नशीबच पालटले.
“मी कांद्यामधून कमावलेल्या पैशांमधून माझे सर्व कर्ज फेडलं आहे आणि आता घर बांधण्याचा विचार करत आहे. मला आणखीन शेतजमीन विकत घ्यायची आहे. हाती असलेल्या या पैशांमधून शेतजमीन घेण्याचाही माझा विचार आहे,” असं मल्लिकार्जून सांगतात. माझ्याकडे १० एकर शेतजमीन आहे. मी आणखीन १० एकर शेतजमीन भाड्याने घेतली होती. एकूण २० एकरांवर कांद्याचे उत्पादन घेतलं. तसेच लागवडीसाठी ५० शेतमजूरांना कामाला लावले. “आमच्या भागामध्ये पाण्याची टंचाई असल्याने आम्हाला पूर्णपणे भूजल पातळीवर अवलंबून रहावे लागते. येथे असणाऱ्या दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे अनेकांनी शेतीच सोडून दिली आहे,” असं मल्लिकार्जून सांगतात.
मागील १९ वर्षांपासून मल्लिकार्जून हे पावसाळ्यामध्ये कांद्याचे उत्पादन घेत आहेत. मागील वर्षी त्यांना पाच लाखांचा निव्वळ नफा झाला होता. ऑक्टोबरपर्यंत देशभरामध्ये कांद्याचे भाव फारसे वाढले नव्हते. त्यामुळेच केलेली गुंतवणूकही सुटेल की नाही याबद्दल मल्लिकार्जून यांना शंका होती. “मी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये घाऊक बाजारात कांदा विकला तेव्हा कांद्याचा दर प्रती क्विंटल सात हजार रुपये इतका होता. काही दिवसांमध्येच हा दर १२ हजार रुपये प्रती क्विंटल इतका झाला,” असं मल्लिकार्जून यांनी सांगितलं. कांद्याचे वाढत्या दरामुळे शेतावर आणि कांद्याच्या वखारीवर सतत लक्ष्य ठेवण्याचे काम कुटुंबातील लोकांना आळीपाळीने करावे लागत होते.
रविवारी रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्....
अधिक वाचा