By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 03:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातच विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील ग्रंथालयातील पिण्याच्या पाण्यात जिवंत बेडूक आढळला आहे. हि घटना म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात टाकणारी आहे व त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. विद्यापीठ प्रशासन यावर अद्याप प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. पाण्याच्या सीलबंद बाटलीत बेडूक आढळल्याने पाण्याच्या व्यवस्थेकडे किती दुर्लक्ष आहे याची कल्पना करणेच अतिशय भीतीदायक आहे.
दरम्यान, गेली अनेक वर्षे विद्यार्थी इथल्या पाणी सुविधेचा वापर करत आहेत. हे पाणी शुद्धीकरण करुन येत असल्याचा विद्यापीठाचा दावा असतो. शुद्धीकरण केलेल्या पाण्यात जर बेडूक असेल तर इतके वर्षे हे विद्यार्थी पाणी पितात ते शुद्ध आहे का ? हे पाहणे महत्वाचे आहे. नेमकं काय घडलं आहे ? याची माहिती आम्ही घेऊ असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.
पुणे - बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीवरील डोमला भ....
अधिक वाचा