ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई - पुणे महामार्गावर धावत्या खासगी बसला आग

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2020 11:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई - पुणे महामार्गावर धावत्या खासगी बसला आग

शहर : मुंबई

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai-Pune highway) मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. चालत्या बसला अचानक आग (bus caught fire) लागल्याने आगीचे तांडव पाहायला मिळाले. यात बस जळून खाक झाली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune highway) मध्‍यरात्री १ वाजण्‍याच्‍या सुमारास धावत्‍या खासगी लक्‍झरी बसला आग (private bus caught fire ) लागली. मात्र, बसमध्ये चालक असल्याने मोठी दुर्घटना टळली.

खालापूर टोलनाक्‍यापासून दोन किलोमीटर अंतरावर मुंबई लेनवर ही घटना घडली. आयआरबी टीमचे दोन आणि खोपोली नगरपालिकेच्‍या एक अग्‍नीशमन पथकाने प्रयत्‍न करून आग अटोक्‍यात आणली असली. मात्र, बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे .

सुदैवाने बसमध्‍ये कोणीही प्रवासी नव्‍हते त्‍यामुळे मोठा अनर्थ टळला. चालकाला कुठलीही इजा झाली नसून तो सुखरूप आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्‍याचं सांगितले जात आहे .  महामार्गावर वाहनांना आगी लागण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढत चालल्या असून तो चिंतेचा विषय बनला आहे.

पुढे  

अॅमेझॉन नरमली : ... तरच चर्चा, मनसेचा आक्रमक पवित्रा
अॅमेझॉन नरमली : ... तरच चर्चा, मनसेचा आक्रमक पवित्रा

मनसेच्या खळ्ळखटॅकनंतर (MNS aggressive) अॅमेझॉन (amazon) कंपनी नरमल्याचे दिसत आहे. मनसेसोब....

Read more