By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 18, 2019 12:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सांताक्रुझ पूर्व येथील साईप्रसाद सोसायटीमध्ये शॉट सर्किटमुळे सकाळी 8 च्या सुमारास अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये सुदैवाने कुठल्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही; ट्रान्सफॉर्मर जुन्या पध्दतीचा असल्यामुळे आणि वीज कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही आग लागली राहिवाशांनी असा अंदाज व्यक्त केला आहे. या आगीमुळे मंदिराचे खूप नुकसान झाले आहे. मंदिराचा छताचा भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण मंदिराचा परिसरच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. परिसरातील झाडे, लाकडेसुद्धा जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.आणि ही आग वेळीच आटोक्यात आणली त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. असेही तेथील प्रत्यक्षदर्शीचे मत आहे.या आगीची चौकशी करावी अशी रहिवाश्यांची मागणी आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश जारी केला आहे. राज्य मंत्रिमंडळा....
अधिक वाचा