By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 29, 2019 11:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईमधील चेंबूर येथील वाशीनाकाच्या इंदिरा नहार परिसरातील एक भिंत कोसळली आहे. यामध्ये चार ते पाच रिक्षांचे नुकसान झाले आहे. ही घटना पहाटे 3 च्या दरम्यान झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.भिंती शेजारी असलेल्या उभ्या असलेल्या 5 रिक्षा आणि त्या ठिकाणच्या रहिवाशांच्या पाळीव बकऱ्या यांनी यांचे नुकसान झाला आहे.या घटनेमध्ये तीन ते 4 बकऱ्या मृत झाल्या आहेत. रात्रीच्या वेळेस ही बाब लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले.
वारंवार या विभागांमध्ये भिंत कोसळण्याच्या घटना घडत असतात यावर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. यापूर्वी अशा घटनांमुळे जीवित हानी देखील झाली आहे. त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
शुक्रवारी सकाळी सुरु झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता. पावसाने उसंत घेतलेली ....
अधिक वाचा