By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 02:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jamshedpur
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अधिकारी म्हणवणार्या एका तरुणाची महिलेने जाम धुलाई केली. या महिलेने मारण्याच्या आधी तिच्या एका नातेवाईकाने या भामट्याची धुलाई केली. त्याने या भामट्याला कुस्तीत वापरतात तसा धोबीपछाड देत नकली अधिकार्याची हाडं खिळखिळी केली. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार या महिलेकडे हा भामटा 50 हजार रूपये मागत होता. तिच्या घरी कौटुंबिक अडचणी होता, त्यातून सुटका करून देतो असं सांगत त्याने हे पैसे मागितले होते.
महिलेला संशय आल्याने तिने या बहुरुप्याला मांगो भागातील एका ठिकाणी बोलावलं. तिथे हा येताच त्याला चपलेने मारायला सुरुवात केली. तिचं मारून झाल्यानंतर तिच्या नातेवाईकानेही या भामट्याला चोपला. तेवढ्या पोलीस आल्याने या भामट्याची सुटका झाली. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून त्याचं नाव फणींद्र माहतो असल्याचं कळालं आहे. त्याच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं बनावटी आयकार्ड देखील सापडलं आहे.
मे महिन्यामध्ये कास तलावाचा आटलेला विसर्ग यामुळे सातारा शहरात पाणीबाणी नि....
अधिक वाचा