ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियान राबवणारे पहिले मंत्री आर. आर. उर्फ आबा पाटील यांची जयंती

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 16, 2019 01:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियान राबवणारे पहिले मंत्री आर. आर. उर्फ आबा पाटील यांची जयंती

शहर : मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत अभियान' सुरू केले. तथापि महाराष्ट्रात 'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान' राज्याचे तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर आर पाटील यांनी यशस्वीपणे राबवली.  आज आर. आर. उर्फ आबा पाटील यांची जयंती आहे. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना त्यांनी जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त अभियान यशस्वीपणे राबवले.ही योजना आजही सुरूच आहे. या योजनेचे चांगले परिणामही समोर आले आहेत. विशेषतः पोलिसांवरील ताण कमी झाला. हे मान्य करावे लागेल.

आबा पाटील यांचा जन्म सांगली जिल्हा तासगाव मधील अंजनी गावात एका सामान्य कुटुंबात 16 ऑगस्ट 1957 रोजी झाला. ते बीए, एलएलबीपर्यंत शिकले होते. 1979 मध्ये सांगलीतील सावळज मधूनच जिल्हा परिषदेवर निवडून गेले.1990 पर्यंत त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले. 1991 मध्ये ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले. तेव्हापासून 2014 पर्यंत सलग सहा वेळा आमदार झाले. विधानसभा सुरुवातीच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रतोद म्हणून काम केले.

1998 मधील विधानसभा लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याच वर्षी त्यांची राज्याच्या ग्रामविकास मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली.1 नोव्हेंबर 2004 रोजी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद म्हणून शपथ घेतली. 2003 ते 2008 आणि  2009 ते 2014 या काळात त्यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून काम पाहिले. 2004 ते 2009 या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले. डान्सबार बंदीचा निर्णय घेऊन त्यांनी त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. या निर्णयावर अनेक स्तरातून टीका झाल्यानंतरही आबा   आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ते एक उत्कृष्ट वक्ता होते. त्यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली माहिती होती.

मागे

 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन
 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त राष्ट्....

अधिक वाचा

पुढे  

कोल्हापुरात पूरग्रस्तांच्या मदतीवर डल्ला
कोल्हापुरात पूरग्रस्तांच्या मदतीवर डल्ला

कोल्हापूर-सांगलीतील अनेक गाव महापुराने उद्ध्वस्त झाली आहेत. या पूरग्रस्ता....

Read more