By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 02:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मुंबई - आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, असं मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयानं एका प्रकरणात निकाल देताना म्हंटले आहे. ३५ वर्षीय बांगलादेशी महिलेला भारतात अवैधपणे प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी न्यालयाने दोषी ठरवून एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ज्योती गाझी उर्फ तस्लिमा रबिउल असं या महिलेचं नाव आहे. ती दहिसर पूर्वेला राहते. न्यायालयानं या प्रकरणी निकाल देताना तिला अवैधरित्या भारतात प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे.
मी बांगलादेशी असून, १५ वर्षांपूर्वी मुंबई शहरात आली होती, असा दावा रबिउलनं केला होता. त्यावर रबीउल ही बांगलादेशी नागरिक आहे आणि तिनं वैध पासपोर्ट किंवा दस्तावेज नसताना भारतात प्रवेश केला आहे, हे आधीच सिद्ध झालं आहे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. सर्वसाधारणपणे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जन्मदाखला, जन्म ठिकाण, आई-वडिलांचं नाव, जन्माचे ठिकाण आणि नागरिकत्वाचा पुरावा असणे गरजेचे आहे. अनेकदा आजी-आजोबांच्या जन्माचं ठिकाणही ग्राह्य धरलं जातं, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणांमध्ये आपण विदेशी नागरिक नाही हे सिद्ध करण्यासाठी आरोपींना पुरावे किंवा दस्तावेज सादर करणे बंधनकारक असते, अशी टिप्पणी न्यायालयानं हा निकाल देताना केली. तत्पूर्वी, रबीउल ही एक महिला आहे म्हणून सूट दिली जावी, हा युक्तिवादही न्यायालयानं फेटाळून लावला. 'जर अशा प्रकारे सूट दिली तर राष्ट्रीय सुरक्षा आणि भारतीय नागरिकांच्या अधिकारांवर गदा येऊ शकते. असं मत न्यायालयानं व्यक्त केलं.
मुंबई - ज्येष्ठ नागरिकांना किंवा कुटुंबातील वयोवृद्ध पालका....
अधिक वाचा