ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'घाबरुन जाऊ नका', मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 17, 2020 09:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'घाबरुन जाऊ नका', मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

शहर : मुंबई

राज्याचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत कलम 144 अंतर्गत संचारबंदीच्या आदेशाबाबत स्पष्टीकरण देत नागरिकांना घाबरुन जाण्याचं आवाहन केलंय. तसेच मुंबईत कोणतेही नवे निर्बंध लादण्यात आले नसून आधीच्या आदेशालाच मुदतवाढ दिल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. मुंबई विभागीय पोलीस आयुक्तालयाकडून कलम 144 अंतर्गत आदेश देण्यात आल्यानंतर मुंबईत संचारबंदीच्या चर्चेला उधाण आलं होतं. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईकरांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. कलम 144 अंतर्गत देण्यात आलेले आदेश 31 ऑगस्टच्या मागील आदेशाला दिलेली मुदतवाढ आहे. नव्याने कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाही. कृपया ही माहिती शेअर करा आणि घाबरु नका.”

मुंबई विभागीय पोलीस आयुक्तालयाने बुधवारी (16 सप्टेंबर) कलम 144 अंतर्गत आदेश देत 30 सप्टेंबरपर्यंत निर्बंध लावले होते. हे आदेश राज्य सरकारच्या 31 ऑगस्ट रोजीच्या निर्बंध शिथिल करणे आणि टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवण्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार म्हणजेच मिशन बिगन अगेननुसार दिले होते. यात नव्याने कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाही.

मागे

मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू; विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई होणार
मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू; विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई होणार

शहरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत वाढत्या रु....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्र्यांनी पोलीस भरती रद्द करावी अथवा आम्हांला आत्महत्येची परवानगी द्यावी-मराठा क्रांती मोर्चा
मुख्यमंत्र्यांनी पोलीस भरती रद्द करावी अथवा आम्हांला आत्महत्येची परवानगी द्यावी-मराठा क्रांती मोर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जी पोलीस दलातील मेगाभरती होणार आहे त....

Read more