By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 29, 2020 06:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांसोबतच अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारकडून होणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली . यात त्यांनी राज्य सरकार महाराष्ट्रात 24X7 ऑफिसेस आणि सर्वांसाठी लोकल सेवा उपलब्ध करुन देण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मुंबई उपनगरातील लोकल रेल्वे सुरु करण्याबाबतही सरकार गंभीर असल्याचं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “मागील मोठ्या कालावधीपासून मुंबईकरांकडून लोकल सेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. त्याचाच विचार करुन कोरोनाची सर्व खबरदारी घेत ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लोकल सेवा सुरु करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. सरकार वेगवेगळ्या उद्योग-व्यवसाय चालकांशीही बोलत असून वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळेत लवचिकता आणण्याबाबत चर्चा सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून व्यावसायिक प्रतिष्ठानं असलेल्या भागात 24X7 ऑफिसेस सुरु करण्यावर विचार सुरु आहे.”
This morning, the district collector and I interacted with the DMCs and Assistant Municipal Commissioners of @mybmc from Mumbai Suburban District on various issues pertaining to “Majhe Kutumb, Majhi Jababdari”. We are committed to ensuring its success, for the safety of citizens pic.twitter.com/DHSzR4eBjf
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 29, 2020
“मुंबईसारख्या मोठ्या शहरात जेथे व्यवसाय, बँका आणि इतर व्यापारी व्यवहारांसाठी वेगवेगळे जिल्हे आहेत, तेथे सर्वांसाठी वेळेचा एकच नियम ठेवणं तसं अवघड आहे. त्यामुळेच आम्ही विविध व्यावसायिकांशी वेगवेगळ्या वेळा ठेवण्याविषयी चर्चा करत आहोत. अखेर आम्ही आठवड्यातील 7 दिवस 24 तास कार्यालये सुरु करण्याच्या योजनेवर आलो आहोत. ही योजना केवळ कोरोना काळासाठी मर्यादित राहणार नाही, तर कोरोना काळानंतर देखील ती वापरता येईल. त्यामुळे कामाच्या वेळेत लवचिकता येईल आणि वाहतुकीवरील ताणही कमी होईल,” असंही आदित्या ठाकरे यांनी नमूद केलं.सध्या तरी 24X7 कार्यालये सुरु ठेवण्याचा प्लॅन अंतर्गत चर्चेत आहे. मात्र, आता विविध व्यावसायिकांशी चर्चा सुरु झाल्याने यावर नक्कीच काहीतरी पर्याय समोर येईल. कोरोनानंतर दुकानदार आणि व्यावसायिकांना पुन्हा रुळावर येण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे, असंही आदित्य ठाकरेंनी नमूद केलं.
संरक्षण विषयक खरेदी व्यवहारांबाबत केंद्र सरकारने नवे धोरण जाहीर केले आहे. ....
अधिक वाचा