By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 07, 2019 06:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
चंडीगढ आता पर्यंत आर्य हे खैबरखिंडीतून भारतात आले. त्यांनी येथील मुळच्या (द्रविड) भारतीयांवर आक्रमण केल्याचेच आपण मानत होतो, कारण इतिहासात तसेच चित्र रेखाटले गेलेले आपण पाहिले. तथापि, भारतीय संस्कृतीच्या प्राचीनतेबद्दल आणि भारतीयांच्या भारतीय मुळाबद्दल एक मोठ संशोधन जगासमोर आल आहे. त्यानुसार भारतात कोणीही बाहेरून आलेले नाही. तर भारतातील लोक अगदी प्राचीन काळापासून इथेच राहत असून सिंधु संस्कृतीतील माणसे आपलेच पूर्वज आहेत. या संशोधनामुळे आर्यांनी भारतावर आक्रमण केल्याचा जुना सिद्धांत मोडीत निघाला आहे.
डेक्कन कॉलेज, हॉवर्ड मेडिकल स्कूल , बिरबल सहानी इंस्टीट्यूट , सिसिएमबी, कॅलिफोर्निया विद्यापीठ अशा जगभरातील 13 प्रख्यात संशोधन संस्थांनी केलेल्या संशोधांनांती प्राचीन भारतीय संस्कृती रुजविणारे आर्य हे भारतीयच असून ते भारताबहेरून आलेले नव्हते. असे सिद्ध करण्यात संशोधकांनी यश मिळविले आहे.
28 शास्त्रज्ञांनी 3 वर्षे अथक प्रयत्न करून हरियाणातील राखीगड येथे सापडलेल्या मानवी सांगाड्यामधून यशस्वीरित्या डीएनए मिळविला. तेव्हाच्या माणसांच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करून हे सर्व शास्त्रज्ञ आर्य हे मुलाचे भारतीयच असल्याच्या निष्कर्षावर आले आहेत.
22 जुलै पासून भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. चंद्रावर नियोजित कार्य....
अधिक वाचा